लेखक हे १९९३ साली श्रीवर्धन पोलीस ठाणे रायगड येथे PSI म्हणून काम करत होते. १९९३ साली झालेल्या मुंबई येथील साखळी बॉम्बस्फोटा साठी वापरण्यात आलेली स्फोटके रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यावर उतरण्यात आल्याने त्या किनाऱ्यावरील भागात काम करणारे कस्टम व पोलीस अधिकाऱ्यांना या गुन्ह्यामध्ये मदत केली म्हणून आरोपी बनवण्यात आले. सदर गुन्ह्यात लेखकाला जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली या खटल्यात लेखकावर प्रचंड अन्याय झाला या शिक्षेत लेखक २३ वर्षांपासून शिक्षा भोगत आहे परंतु मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी म्हणून लेखकावरील अन्यायाकडे कोणी लक्ष दयायला तयार नाही त्यामुळे शेवटी लेखकाने आपल्यावरील अन्याय जनते समोर मांडायचे ठरवले.
या पुस्तकात लेखकाने,
०१ आपल्या कडून नेमक्या काय चुका झाल्या, आरोप काय आहे, न्यायालयाने कशी शिक्षा दिली व आपल्यावर नेमका कसा अन्याय झाला हे या ठिकाणी स्पष्टपणे काहीही न लपवता लिहिलेले आहे.
०२ आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी लेखकाने विधायक मार्गाने सर्व प्रत्यत्न केले पण लेखकाची बाजू सत्य असताना देखील कसा न्याय मिळाला नाही याबाबत सविस्तर वर्णन केलेले आहे.
०३ या पुस्तकात कायदेशीर बाबींसोबत लेखकाने आपला जीवनप्रवास मग तो कौटुंबीक असेल, कारागृहातील असेल अथवा अध्यात्मिक असेल तो अगदी प्रामाणीक पणे मांडलेला आहे.
०४तसेच लेखकाने एकच न्यायाधीश वेगवेगळ्या आरोपीसाठी वेगवेगळी मोजपट्टी कशी वापरतो हे वाचकांना समजण्यासाठी लेखकामध्ये व कस्टम अधिकाऱ्यांमध्ये न्यायालयाने केलेला भेदभाव, संजय दत्त बाबत न्यायालयाने वापरलेली मोजपट्टी याबाबत स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे.
०५ याचबरोबर आपल्या व्यवस्थेमधील त्रूटींमुळे एखाद्या व्यक्तिवर आपल्या देशात कसा अन्याय होऊ शकतो व पैसा व सत्ता असलेले लोक कायदयाच्या कचाट्यातून कसे सुटतात याचे वास्तव वर्णन केले आहे.
०६आपल्याकडून घडलेली घटना व आज जनतेसमोर लेखकाची नकारात्मक झालेली प्रतीमा हा प्रवास लेखकाने पुस्तकामध्ये मांडलेला आहे.
त्यामुळे पोलीस खात्यातील, वकीली क्षेत्रातील, न्यायदान क्षेत्रातील तसेच शासकीय व्यवस्थेतील व सामाजीक कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आवर्जून वाचावी अशी आपल्या अनुभवात भर घालनारी सत्य कथा “?
सत्यमेव जयते”.